क्वारांटाईनमध्ये प्रार्थनाची अशी झाली चंम्पी, तिने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:11 IST2020-03-27T19:04:46+5:302020-03-27T19:11:54+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय असते.

Prarthana behere share her head massage video on social media | क्वारांटाईनमध्ये प्रार्थनाची अशी झाली चंम्पी, तिने शेअर केला व्हिडीओ

क्वारांटाईनमध्ये प्रार्थनाची अशी झाली चंम्पी, तिने शेअर केला व्हिडीओ

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकताच प्रार्थनाने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ प्रार्थनाचे बाबा तिच्या केसांना तेल मालिश करताना दिसतायेत. प्रार्थनाने या व्हिडीओला चंम्पी असे कॅप्शन दिले आहे. 


सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत. अशात नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. क्वारांटाईन झालेला कलाकार सोशल मीडियावर  अॅक्टिव्ह आहेत. प्रार्थनाने सुद्दाचा क्वारांटाईनमधला व्हिडीओ शेअर केला आहे. 


प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.

Web Title: Prarthana behere share her head massage video on social media