पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसली प्रार्थना बेहरे, फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:29 IST2024-08-01T14:28:42+5:302024-08-01T14:29:35+5:30

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.

Prarthana Behere, flaunting her figure, was seen enjoying herself getting drenched in the rain | पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसली प्रार्थना बेहरे, फ्लॉन्ट केली फिगर

पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसली प्रार्थना बेहरे, फ्लॉन्ट केली फिगर

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच ती 'बाई गं' (Bai Ga Movie) सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटात ती स्वप्नील जोशीसोबत झळकली आहे. दरम्यान आता प्रार्थनाचा सोशल मीडियावरील व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात ती पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाची कॉटनची साडी आणि स्लिव्हलेस लाल ब्लाउज परिधान केली आहे. या व्हिडीओत ती चिंब भिजलेली दिसत आहे. निसर्गरम्य वातावरणात ती पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. यात तिने तिची फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, पावसात नाचणे हा माझा एक प्रकारचा मूड आहे. 


व्हिडीओला मिळतोय चांगला प्रतिसाद
प्रार्थना बेहरेच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांनी हार्ट इमोजीसोबत सुंदर अशी कमेंट केली आहे. 

वर्कफ्रंट
एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रार्थना बेहरेला पहिला ब्रेक मिळाला होता. या मालिकेत तिने वैशाली ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेनंतर प्रार्थनाची अनेक मराठी सिनेमांमध्ये वर्णी लागली. 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'फुगे', 'व्हॉट्स अप लग्न', 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' अशा अनेक सिनेमांमध्ये प्रार्थना मुख्य भूमिकेत दिसली.  

Web Title: Prarthana Behere, flaunting her figure, was seen enjoying herself getting drenched in the rain