प्रार्थना बेहरेने ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दाखवल्या सेक्सी अदा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 17:06 IST2020-01-14T17:03:11+5:302020-01-14T17:06:22+5:30

या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे.

Prarthana behere did new photoshoot on instagram | प्रार्थना बेहरेने ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दाखवल्या सेक्सी अदा !

प्रार्थना बेहरेने ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दाखवल्या सेक्सी अदा !

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. प्रार्थनाने तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत ती खूपच सेक्सी व बोल्ड दिसते आहे. 


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.


प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. 

Web Title: Prarthana behere did new photoshoot on instagram