प्रार्थना बेहरेला मिळालं आईकडून सर्वात सुंदर गिफ्ट, म्हणाली-थँक्यू आई..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 15:50 IST2021-01-16T15:50:00+5:302021-01-16T15:50:01+5:30

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.

Prarthana Behera received the most beautiful gift from her mother | प्रार्थना बेहरेला मिळालं आईकडून सर्वात सुंदर गिफ्ट, म्हणाली-थँक्यू आई..

प्रार्थना बेहरेला मिळालं आईकडून सर्वात सुंदर गिफ्ट, म्हणाली-थँक्यू आई..

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटला घेऊन सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रार्थनाने पुन्हा एकदा लाल रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केलं आहे. लाल रंगाच्या साडीत प्रार्थनाचे सौंदर्य चांगलेच खुलून आलं आहे.

विशेष म्हणजे ही साडी प्रार्थनाला तिच्या आईनं गिफ्ट केली आहे. प्रार्थनानेच याची माहिती दिली आहे. थँक्यू आई..माझ्या आई ने दिलेले सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट. असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे. नेहमीप्रमाणे फॅन्सनी प्रार्थनाच्या या फोटोशूटला देखील दाद दिली आहे. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: Prarthana Behera received the most beautiful gift from her mother