अभिनेत्रींना एखाद्या भुमिकेसाठी कधीतरी टोटली डिफरंट लुक करावा लागतो. ज्याप्रमाणे कॅरॅक्टरची डिमांड असते तसेच त्याप्रमाणेच ...
प्राजक्ताची लुक टेस्ट
/> अभिनेत्रींना एखाद्या भुमिकेसाठी कधीतरी टोटली डिफरंट लुक करावा लागतो. ज्याप्रमाणे कॅरॅक्टरची डिमांड असते तसेच त्याप्रमाणेच त्यांना स्वत:चा मेकओवर करणे भाग पडते. अशा किती तरी अभिनेत्री असतील ज्यांनी त्यांच्या रोल साठी केलेला मेकओवरच नंतर त्यांची ओळख बनून गेली. मालिका अन चित्रपटांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला सुद्धा तिच्या एका भुमिकेसाठी लुक टेस्ट करायचाय. कोणतीही अभिनेत्री साहजिकच तिच्या लुक बद्दल कॉन्शिअस असणार. अशीच एक्सयटेड आणि नर्व्हस प्राजक्ता माळी तिच्या लुक टेस्ट साठी झाली आहे. डिफरंट-डिफरंट हेअर -स्टाईल मधील फोटो तिने अपलोड केले असुन तिच्या चाहत्यांनाच ती विचारत आहे कि तुम्हाला कोणता लुक आवडतोय. एकदा का तिच्या चाहत्यांनी तिच्या लुक ला ग्रीन सिग्नल दाखविला म्हणजे तिचा लुक हिट झाला म्हणुनच समजा. क्या बात है प्राजक्ता, तुझी ही आयडीया नक्कीच सिक्सर मारेल यात शंका नाही.