प्राजक्ता माळी व्हॅकेशनसाठी गेली या ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 17:50 IST2021-02-08T17:49:57+5:302021-02-08T17:50:50+5:30
प्राजक्ता माळीने नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ शेअर करत व्हॅकेशनला जात असल्याचे सांगितले आहे.

प्राजक्ता माळी व्हॅकेशनसाठी गेली या ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल
प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि अदा तसेच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्या वेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
प्राजक्ता माळी हिने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत...म्हटलं आपणही जे सहज शक्य आहे ते करूया. ऑफ टू व्हॅकेशन. हिमाचल प्रदेश.
प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.