"देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात..." प्राजक्ता माळीची पोस्ट, 'त्या' खास व्यक्तीचे मानले आभार; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:13 IST2025-10-12T13:13:03+5:302025-10-12T13:13:54+5:30
प्राजक्ताने केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

"देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात..." प्राजक्ता माळीची पोस्ट, 'त्या' खास व्यक्तीचे मानले आभार; म्हणाली...
प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहायला मिळाली. ती सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच तिच्या हटके पोस्टनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच प्राजक्ताने केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
प्राजक्ताच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि यशस्वी चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'फुलवंती' चित्रपटाला काल (प्रदर्शित होऊन) एक वर्ष पूर्ण झाले आहे. 'फुलवंती' हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेला. या निमित्ताने प्राजक्ता माळीनेसोशल मीडियावर एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमध्ये 'फुलवंती' या व्यक्तिरेखेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
प्राजक्ताने लिहिले, "यंदाचे जवळपास सर्व पुरस्कार जीनं मिळवून दिले, त्या "फुलवंती"च्या प्रदर्शनाला आज १ वर्ष पुर्ण झालं... देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात आली... ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी तो नक्की पहा. प्राईम व्हिडीओ आणि zee5 वर चित्रपट उपलब्ध आहे. सौंदर्य आणि कलेची अनभिषिक्त सम्राज्ञी फुलवंती तर दुसरीकडे विद्याविभूषित प्रकांडपंडित शास्त्रीबुवा... यांच्यामधील संघर्षाला १ वर्ष पूर्ण झालं. वर्षपूर्ती 'फुलवंती' चित्रपटाची" या शब्दांत प्राजक्तानं 'फुलवंती' भूमिकेबद्दल प्रेम व्यक्त केलं.
प्राजक्ताची ही भावनिक पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडली असून, त्यांनी प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताचा 'फुलवंती' सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमातील गाणीही लोकप्रिय ठरली. फुलवंतीमधील 'मदनमंजिरी' हे लावणी गाणं हिट झालं होतं. अनेकांनी प्राजक्ताच्या या गाण्याच्या हुक स्टेप करत रील्स बनवले होते. या सिनेमात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. तर स्नेहल तरडेंनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, क्षितिश दाते, सुखदा खांडकेकर, दीप्ती लेले अशी सिनेमाची स्टारकास्ट होती.