प्राजक्ता माळीचं 'न्यू इयर रिझोल्यूशन' काय? अभिनेत्रीचा संकल्प ऐकून तुम्ही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:32 IST2025-12-26T14:14:25+5:302025-12-26T14:32:14+5:30
प्राजक्ता माळीचा नवीन वर्षाचा संकल्प वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

प्राजक्ता माळीचं 'न्यू इयर रिझोल्यूशन' काय? अभिनेत्रीचा संकल्प ऐकून तुम्ही कराल कौतुक
Prajakta Mali New Year Resolution For 2026 : आपल्या निखळ सौंदर्याने, साध्या आणि तरीही नखरेल अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते. २०२६ हे नवीन वर्ष उंबरठ्यावर असताना प्राजक्ताने आपला एक अतिशय महत्त्वाचा संकल्प चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा हा संकल्प ऐकून अनेकांनी तिचे कौतुक केलंय. नवीन वर्षात प्राजक्ता केवळ अभिनयातच नाही, तर आपल्या व्यक्तित्वातही एक नवी 'पॉवरफुल' इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी एक 'आस्क मी सेशन' केले होते. यावेळी एका नेटकऱ्याने तिला विचारलेल्या प्रश्नावर प्राजक्ताने उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने तिच्या नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दल विचारलं. यावर प्राजक्ता म्हणाली, "यंदा माझा नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की, मी कोणालाही माझा अपमान करू देणार नाही. इतरांपेक्षा स्वतःशी दयाळूपणे वागणं आणि स्वतःचा आदर ठेवणं हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे".

प्राजक्ताच्या या संकल्पातून तिने स्वतःवरील प्रेम आणि स्वाभिमान या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे स्पष्टपणे दिसून आलं. दरम्यान, प्राजक्तासाठी २०२५ हे वर्ष हेदेखील खास ठरलं. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटासाठी २०२५ मध्ये प्राजक्ताला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. प्राजक्ताची लोकप्रियता केवळ पडद्यापुरती मर्यादित नाही. इन्स्टाग्रामवर तिचे २.३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.