'सगळं गेलं तेल लावत' म्हणत खरेदी केलं कर्जतचं फार्महाऊस, प्राजक्ता माळीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:11 PM2023-09-14T20:11:35+5:302023-09-14T20:19:16+5:30

पैसे नसतानाही कर्ज काढून आपण फार्महाऊस का घेतलं याचा खुलासा खुद्द प्राजक्तानेच एका मुलाखतीमध्ये केलाय. 

Prajakta Mali on farmhouse of Karjat | 'सगळं गेलं तेल लावत' म्हणत खरेदी केलं कर्जतचं फार्महाऊस, प्राजक्ता माळीचा खुलासा

Prajakta Mali

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ती महाराष्ट्राची क्रश बनली आहे. प्राजक्ता सातत्याने चर्चेत येत असते.  नुकतेच प्राजक्ताने थेट कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात फार्महाऊस खरेदी केलं. हिरवागार परिसर, छोटे छोटे धबधबे आणि सुंदर निसर्ग अशा नयनरम्य ठिकाणी प्राजक्ताचं फार्महाऊस आहे.  कर्जतला निसर्गाच्या कुशीत घर घ्यायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पैसे नसतानाही कर्ज काढून आपण हे फार्महाऊस का घेतलं याचा खुलासा खुद्द प्राजक्तानेच एका मुलाखतीमध्ये केलाय. 


मुलाखतीमध्ये प्राजक्ता म्हणाली, “मला बाबा निसर्गात राहायला खूप जास्त आवडतं. गुंतवणूक म्हणून नाही तर आत्मिक समाधानातून मी फार्महाऊस घेण्याचा निर्णय घेतला होता. मला एवढं मोठं घ्यायचं पण नव्हतं. माझं तेवढं बजेटही नव्हतं.  पण ते मी घर पाहिलं आणि प्रेमात पडले. कारण तिकडे डोंगर, धबधबे आणि झरे आहेत.  जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळंच पाहायला मिळते. शेवटी मी विचार केला सगळं गेलं तेल लावत,  मग एकदा आवडलं तर आवडलं. उगाच रुखरुख करुन जगण्यात अर्थ नाही. तेव्हा ते घर आवडलेलं, अस म्हणत़ पश्चताप करणं आवडत नाही. एकतर गोष्ट करा नाहीतर करु नका. मग मी कर्ज काढलं आणि घर घेतलं". 


फार्महाऊस घेतलं तेव्हा प्राजक्ताने काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने म्हटलं होतं की, 'स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House”. (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. कर्जत.  नाव असणार आहे - “प्राजक्तकुंज”.  (१- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज ३- प्राजक्तकुंज, प्राजक्तत्रयी पुर्ण.)  खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी...फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.' 

प्राजक्ताने कर्जतच्या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असं नाव दिलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार परिसरात प्राजक्ताचं हे फार्महाऊस आहे. तिच्या फार्महाऊसमध्ये एन्ट्री करण्यासाठी एक मोठा गेटही बनवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा वाढदिवसही झाला. हास्यजत्रेच्या टीमकडून तिच्या कर्जतच्या फार्महाऊसवर वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करत हास्यजत्रा फेम वनिता खरातने प्राजक्ताच्या कर्जतमधील फार्महाऊसची झलकही दाखवली आहे.

Web Title: Prajakta Mali on farmhouse of Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.