प्राजक्ता माळीनं दिल्या फिटनेस टिप्स, आहार, झोप आणि व्यायाम रुटिनबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:54 IST2025-12-25T12:53:07+5:302025-12-25T12:54:04+5:30
प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं 'हे' आहे गुपित! चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिल्या खास हेल्थ टिप्स

प्राजक्ता माळीनं दिल्या फिटनेस टिप्स, आहार, झोप आणि व्यायाम रुटिनबद्दल म्हणाली...
Prajakta Mali Instagram Session : अभिनेत्री प्राजक्ता माळीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. प्राजक्ताचं तेजस्वी रूप आणि आत्मविश्वास खूपच प्रेरणादायी आहे. ती फिट आणि ग्लोइंग राहण्यासाठी जी पद्धत वापरते, ती कोणत्याही महागड्या डाएट चार्टवर नाही. ते पूर्णपणे रोजच्या दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या सवयींवर अवलंबून आहे. आता नुकतंच प्राजक्तानं आपल्या चाहत्यांना खास आहार, झोप आणि व्यायाम रुटिनबद्दल खास फिटनेस टिप्स दिल्यात.
नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी एक 'आस्क मी सेशन' केले होते. यावेळी एका नेटकऱ्याने तिला विचारलेल्या प्रश्नावर प्राजक्ताने उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने विचारलं, "प्राजक्ता ताई, तू मला एक परफेक्ट हेल्थ टिप देऊ शकतेस का?" यावर उत्तर देताना प्राजक्ताने दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले की, रात्री किमान ८ तासांची झोप घेणे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्रांतीशिवाय शरीर फिट राहू शकत नाही. यासोबतच मानसिक आरोग्यासाठी रोज २० मिनिटं ध्यान करण्याचा सल्लाही तिने दिला.

काय खावे आणि काय टाळावे?
प्राजक्ताने याआधीही अनेकदा विविध मुलाखतींमध्ये केवळ झोपच नाही तर आहाराबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तिच्या मते, जेवढं ताजं अन्न खाल, तेवढा तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. शिळं अन्न आणि पॅकेज फूड खाणे पूर्णपणे टाळावे. रात्री २-३ वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसू शकत नाही. त्यामुळे लवकर झोपून पहाटे लवकर उठण्याची सवय लावावी. सौंदर्य आणि आरोग्यासाठी केवळ आहार पुरेसा नसून, नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्राजक्ताने आवर्जून नमूद केल्. तिचे हे साधे पण प्रभावी नियम फॉलो केल्यास कोणीही निरोगी राहू शकते, असा विश्वास तिने व्यक्त केला.