'बहरला मधुमास' गाण्यावर प्राजक्ताचा डान्स, अंकुश चौधरी म्हणतो, "आमची प्रेरणास्थान, गोड..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:51 PM2023-04-03T15:51:41+5:302023-04-03T15:52:45+5:30

अंकुशची प्राजक्ता माळीसाठी गोड पोस्ट

prajakta mali dances on baharla ha madhumas trending song ankush chaudhari shared post | 'बहरला मधुमास' गाण्यावर प्राजक्ताचा डान्स, अंकुश चौधरी म्हणतो, "आमची प्रेरणास्थान, गोड..."

'बहरला मधुमास' गाण्यावर प्राजक्ताचा डान्स, अंकुश चौधरी म्हणतो, "आमची प्रेरणास्थान, गोड..."

googlenewsNext

सध्या इन्स्टाग्राम रील्सवर एका मराठी गाण्याने धुमाकूळ घातलाय. केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) आगामी 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील 'बहरला हा मधुमास नवा...' हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. सेलिब्रिटी असो किंवा चाहते सर्वच या गाण्यावरची स्टेप करत रील बनवत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali)  नुकतेच या गाण्यावरचे रील पोस्ट केले. तर अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Chaudhari) तिचा व्हिडिओ रिपोस्ट करत प्राजक्ताबद्दल छान कॅप्शनही लिहिले.

प्राजक्ताने अबोली रंगाच्या साडीत 'बहरला हा मधुमास...' गाण्यावर डान्स केला. अंकुशने प्राजक्ताचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'आमची प्रेरणास्थान, प्राजक्तराजची गोड संस्थापक, प्राजक्ता माळी या लोकप्रिय गाण्यात तिचे वेगळेपण दाखवत, प्राजक्तराजचे दागिने झळकवत आहे.'

अंकुशच्या या पोस्टवर प्राजक्ताने 'awwww' अशी कमेंट केली आहे. अंकुश आणि प्राजक्ताने याआधी 'लकडाऊन' सिनेमात एकत्र काम केले आहे.  'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेत्री म्हणून केदार शिंदेंची लेक सना शिंदे पदार्पण करत आहे. 28 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होतोय. सध्या 'बहरला मधुमास' गाणं चांगलंच लोकप्रिय होत आहे. त्यातच सिनेमाचं जोरदार प्रमोशनही होतंय. 

Web Title: prajakta mali dances on baharla ha madhumas trending song ankush chaudhari shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.