फोटोतील 'ही' चिमुकली आजच्या घडीला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, ओळखा पाहू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:16 IST2025-08-12T13:16:18+5:302025-08-12T13:16:48+5:30
फोटोमध्ये दिसणाऱ्या या गोंडस चिमुरडीला पाहून कोण अंदाज लावू शकेल का?

फोटोतील 'ही' चिमुकली आजच्या घडीला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, ओळखा पाहू!
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी या ना त्या कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात त्यांच्या आगामी सिनेमाचे अपडेट्स किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील एखादा किस्सा,फोटो, प्रसंग ते शेअर करत असतात. सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये दिसणाऱ्या या गोंडस चिमुरडीला पाहून कोण अंदाज लावू शकेल का? आज हीच चिमुरडी अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री बनली आहे. जिच्या स्टाईलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांवर जणू मोहीनीच टाकली आहे. या अभिनेत्रीने मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि काही वर्षांतच ती मराठी फिल्मी दुनियेतील चर्चेचा विषय बनली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर प्राजक्ता माळी (Prajakta Mali Childhood Photo) आहे.
प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत लहानपणीची प्राजक्ता सत्यनारायण पूजेसमोर हात जोडून बसलेली दिसते. खास म्हणजे, तिने तोच क्षण पुन्हा रिक्रिएट केला आहे. प्राजक्तानं पुन्हा भावासोबत बसून अगदी सारखीच पोझ देत फोटो काढला आहे. या फोटोंना तिनं "तेव्हा आणि आता... सत्यनारायण पूजेची आठवणी... उशीरा रक्षाबंधन", असं कॅप्शन दिलंय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.