प्राजक्ता माळीसाठी कसं होतं २०२५ वर्ष? जानेवारी ते डिसेंबर वर्षभराच्या आठवणींचा व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:41 IST2025-12-31T16:38:40+5:302025-12-31T16:41:50+5:30
प्राजक्ता माळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून २०२५ वर्ष तिच्यासाठी कसं होतं, याबद्दल सांगितलं.

प्राजक्ता माळीसाठी कसं होतं २०२५ वर्ष? जानेवारी ते डिसेंबर वर्षभराच्या आठवणींचा व्हिडीओ केला शेअर
Prajakta Mali 2025 Recap Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून २०२५ वर्ष तिच्यासाठी कसं होतं, याबद्दल सांगितलं.
प्राजक्तानं सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना एक अत्यंत भावूक पण तितकीच प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये २०२५ सालातील जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, आनंदाचे दिवस आणि कठीण प्रसंगांची एक हृदयस्पर्शी झलक पाहायला मिळत आहे.
प्राजक्तानं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "२०२५ हे वर्ष सेल्फ-हिलिंग, अडचणींना सामोरे जाणे, कौतुक आणि अशा अनेक गोष्टींनी भरलेलं होतं, ज्या शब्दांत मांडणं कठीण आहे. पण मी नेहमीच मानते की, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि शेवटी विजय सत्याचाच होतो. या विचारानेच मला शहाणं, सकारात्मक आणि कायम हसत ठेवलं".
कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला मानसिकरीत्या सक्षम करण्यासाठी प्राजक्ताने अध्यात्माचा आधार घेतल्याचे सांगितले. ती म्हणाली, "आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ३ नवीन कोर्सेसनी मला पुन्हा स्वतःला सावरण्यात खूप मदत केली". स्वतःची ओळख एका लढवय्या प्रमाणे व्हावी, अशी इच्छा प्राजक्ताची आहे. ती म्हणाली, "मला एक लढवय्या म्हणून ओळखलं जावं असं वाटतं आणि २०२६ मध्येही मी माझ्या लढाया लढत राहीन. लवकरच भेटूया २०२६. मनात कृतज्ञता ठेवून", असं ती शेवटी म्हणाली.