अभिनेत्री मृणाल दुसानिसचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:17 IST2023-12-28T14:15:25+5:302023-12-28T14:17:27+5:30

मृणालने आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Popular Marathi actress Mrunal Dusanis is enjoying motherhood living in america | अभिनेत्री मृणाल दुसानिसचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या

अभिनेत्री मृणाल दुसानिसचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्याmarathi

'तू तिथे मी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरात पोहचली आहे.  मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिलखुलास चेहरा म्हणून तिला ओळखले जाते. मृणालने आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ही अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. तर सध्या मृणाल काय करते? कुठे आहे ? हे आपण जाणून घेऊया. 

अभिनय सोडल्यानंतर अभिनेत्री पती आणि मुलीसोबत सध्या अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या डल्लास या शहरात वास्तव्यास आहे.  मृणाल सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नव्हती. परंतु आता हळूहळू ती सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसून येत आहे. नुकतेच मृनालने लेक आणि पतीसोबत अमेरिकेत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. याचे व्हिडीओ आणि फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. 

मृणालच्या लेकीचं नाव नुर्वी तर पतीचं नाव नीरज मोरे असे आहे. दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं.  नीरज हा सॉफ्टवेअर इंजीनीअर आहे. त्यानंतर मृणालनं अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. नंतर तिनं 2018 मध्ये 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमधून तिनं दमदार कमबॅक केलं. मृणालने 24 मार्च 2022 ला मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंंतर मृणाल पुन्हा अभिनयापासून ब्रेक घेतला.  येत्या काळात भारतात परतणार का, पुन्हा मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा सोशल मीडियावर चाहते तिला करत असतात. 

Web Title: Popular Marathi actress Mrunal Dusanis is enjoying motherhood living in america