पूजाचा हा फोटो तुम्हीलाही पाडेल तिच्या प्रेमात, फॅन्सनी दिली ब्युटी क्वीनची उपाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 07:15 IST2019-09-20T07:15:00+5:302019-09-20T07:15:00+5:30

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं

Pooja sawant share her beautifly photo social media | पूजाचा हा फोटो तुम्हीलाही पाडेल तिच्या प्रेमात, फॅन्सनी दिली ब्युटी क्वीनची उपाधी

पूजाचा हा फोटो तुम्हीलाही पाडेल तिच्या प्रेमात, फॅन्सनी दिली ब्युटी क्वीनची उपाधी

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. नुकताच पूजाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो बघून पूजाने तो मेकअप रुममध्ये काढला आहे. पूजाच्या या फोटोला फॅन्सनी चांगलीच दाद दिली.  


काही दिवसांपूर्वी पूजाने दगडी चाळ 2 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पूजाने ही माहिती फॅन्सना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली. पूजा आणि अंकुश चौधरीच्या जोडीचा दगडी चाळ सिनेमा चांगलाच हिट झाला होता. चाहत्यांना या दोघांची जोडी खूपच भावली होती.

त्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.
 

Web Title: Pooja sawant share her beautifly photo social media