पूजाच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा, पाहा तिचा घायाळ करणारा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:04 IST2019-07-09T11:03:14+5:302019-07-09T11:04:41+5:30

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते.

Pooja sawant share beautiful photo on instagram | पूजाच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा, पाहा तिचा घायाळ करणारा अंदाज

पूजाच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा, पाहा तिचा घायाळ करणारा अंदाज

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. सोशल मीडियावर पूजाचे नेहमीच हटके अंदाजातील फोटो आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच पूजाने तिचा इंडो वेस्टर्न लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत पूजाने ब्ल्यु रंगाचा स्कर्ट टॉप परिधान केला आहे. या फोटोला पूजाने एक कॅप्शन देखील दिले आहे. पूजाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 


 पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.

Web Title: Pooja sawant share beautiful photo on instagram