पूजा सावंतला येतेय होणाऱ्या पतीची आठवण, म्हणते - "मला काय हवंय ते...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 17:48 IST2024-01-30T17:47:30+5:302024-01-30T17:48:59+5:30

Pooja Sawant : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने होणाऱ्या नवऱ्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लाइफ पार्टनर म्हणून सिद्धेश चव्हाण याची तिने निवड केली आहे.

Pooja Sawant remembers her future husband, says - "What I want...". | पूजा सावंतला येतेय होणाऱ्या पतीची आठवण, म्हणते - "मला काय हवंय ते...."

पूजा सावंतला येतेय होणाऱ्या पतीची आठवण, म्हणते - "मला काय हवंय ते...."

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने होणाऱ्या नवऱ्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लाइफ पार्टनर म्हणून सिद्धेश चव्हाण याची तिने निवड केली आहे. तेव्हापासून ती चर्चेत आहे. लवकरच पूजा आणि सिद्धेश लग्नगाठ बांधणार आहेत. दरम्यान आता पूजाने सिद्धेशच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने होणारा नवरा सिद्धेश चव्हाणसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकात…मला काय हवंय हे मलाच माहित आहे….लवकर भेट सिद्धेश. तिच्या या पोस्टवर सिद्धेशनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, बोजू, तुझी खूप आठवण येतेय. तुला भेटण्याची वाट पाहतोय. तसेच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी देखील पूजाच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

सिद्धेश आणि पूजा यावर्षी लग्नगाठ बांधतील अशी शक्यता आहे. सध्या दोघंही लग्नाआधीचा हा रोमँटिक वेळ एन्जॉय करत आहेत. सिद्धेश ऑस्ट्रेलियात स्थायिक असून पूजा लग्नानंतर कुठे स्थायिक होणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र सिद्धेश काही वर्षांसाठीच ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला असून नंतर तो मुंबईतच येणार असल्याचे पूजाने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Pooja Sawant remembers her future husband, says - "What I want...".