'ही' मराठमोळी अभिनेत्री बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा तिचा बोल्ड इन ब्लॅक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:46 IST2020-01-06T10:43:45+5:302020-01-06T10:46:56+5:30

सोशल मीडियावर सध्या पूजाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात पूजाचा हा फोटो आहे.

Pooja Sawant Photos: The hottie's Most stylish looks Ever | 'ही' मराठमोळी अभिनेत्री बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा तिचा बोल्ड इन ब्लॅक अंदाज

'ही' मराठमोळी अभिनेत्री बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा तिचा बोल्ड इन ब्लॅक अंदाज

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री पूजा सावंत हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली.   


अभिनेता विद्युत जामवालसोबत ती 'जंगली' सिनेमात झळकली. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.  आता सोशल मीडियावर तिने  काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या पूजाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात पूजाचा हा फोटो आहे.

 
तिचा हा अंदाज  चाहत्यांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. पूजाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. मात्र वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिने केलेले हे फोटोशूट सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Pooja Sawant Photos: The hottie's Most stylish looks Ever