लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय पूजा सावंत, पाहा ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 15:06 IST2021-03-05T15:04:30+5:302021-03-05T15:06:46+5:30

लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे.

Pooja Sawant looks very stunning in red dress | लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय पूजा सावंत, पाहा ग्लॅमरस फोटो

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय पूजा सावंत, पाहा ग्लॅमरस फोटो

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर'मध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. पूजाने लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा स्टनिंग दिसतेय. या फोटोंमधील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने महिला माहूताची भूमिका साकारली होती.

Web Title: Pooja Sawant looks very stunning in red dress