एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दितसेय पूजा सावंत, फोटोंनी वेधलं चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:05 IST2021-03-19T13:33:41+5:302021-03-19T14:05:41+5:30

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे

Pooja sawant looks very beautiful in ethnic dress | एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दितसेय पूजा सावंत, फोटोंनी वेधलं चाहत्यांचे लक्ष

एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दितसेय पूजा सावंत, फोटोंनी वेधलं चाहत्यांचे लक्ष

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. अलीकडेच पूजाने तिच्या लाल रंगाच्या ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केला आहे. ट्रेडिशनल फोटोशूटमध्ये पूजा खूपच सुंदर दिसतेय. पूजाच्या सौंदर्याला ड्रेसमध्ये चार चांद लागले आहेत. फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी फोटोवर लाईक्ल आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.

Web Title: Pooja sawant looks very beautiful in ethnic dress