पूजा सावंतचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 11:04 IST2019-06-18T10:58:30+5:302019-06-18T11:04:49+5:30
पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सावंतचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने तिचा इंडो वेस्टर्न लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोतला हा लूक पूजाच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे.
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे. या फोटोला पूजाने कॅप्शनदेखील दिले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते.