PHOTOS : मराठमोळ्या या अभिनेत्रीला पाहताच तुम्हाला विसर पडेल बॉलिवूडच्या बालांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:00 IST2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:00+5:30

वेस्टर्न असो किंवा एथनिक लूक...कोणत्याही गेटअपमध्ये ही अभिनेत्री सुंदर दिसते.

PHOTOS: When you see this actress, you will forget about Bollywood actress | PHOTOS : मराठमोळ्या या अभिनेत्रीला पाहताच तुम्हाला विसर पडेल बॉलिवूडच्या बालांचा

PHOTOS : मराठमोळ्या या अभिनेत्रीला पाहताच तुम्हाला विसर पडेल बॉलिवूडच्या बालांचा


'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे 'वेब क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे 'हिची चाल तुरु तुरु...' नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

मिथिला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. 

मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मिथिलाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केले आहे. या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मिथिलाचे सौंदर्य आणखी खुलले आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे.

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.
 

Web Title: PHOTOS: When you see this actress, you will forget about Bollywood actress