बबनचं चित्रीकरण जुलैनंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 15:33 IST2016-04-30T10:03:23+5:302016-04-30T15:33:23+5:30

‘ख्वाडा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे बबन या नव्या चित्रपटाची सध्या तयारी करत आहेत. या चित्रपटाच्या कास्टिंगचं काम सुरू असून ...

Photographs of Baban | बबनचं चित्रीकरण जुलैनंतर

बबनचं चित्रीकरण जुलैनंतर

्वाडा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे बबन या नव्या चित्रपटाची सध्या तयारी करत आहेत. या चित्रपटाच्या कास्टिंगचं काम सुरू असून चित्रपटाचं चित्रीकरण जुलैनंतर सुरू होणार असल्याची माहिती भाऊराव यांनी दिली. ‘ख्वाडा’ या चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटात काही नवोदित चेहरे झळकणार आहेत. पण त्याचसोबत काही दिग्गज कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कलाकारांशी बोलणी सुरू असून कोणाचीही नावे अद्याप ठरलेली नाहीत. चित्रपटात कॉलेज वयातील तरुणांची प्रेमकथा पाहायला मिळणार असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार आहे. 

Web Title: Photographs of Baban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.