या फोटोत एक आहे मराठमोळी तर दुसरी आहे बॉलिवूड अभिनेत्री? ओळखा पाहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:00 IST2019-12-22T20:00:00+5:302019-12-22T20:00:00+5:30

सिनेमात सई आणि क्रिती सॅनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून पुन्हा एकदा महिला प्रधान सिनेमा नवीन वर्षात 2020 मध्ये रसिकांना पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

In this photo one is a Marathi actress Sai Tamhankar and the other is a Bollywood actress Kriti Sanon | या फोटोत एक आहे मराठमोळी तर दुसरी आहे बॉलिवूड अभिनेत्री? ओळखा पाहू

या फोटोत एक आहे मराठमोळी तर दुसरी आहे बॉलिवूड अभिनेत्री? ओळखा पाहू

लवकरच  करिना कपूर खान आणि कियारा आडवाणी 'गुडन्यूज' आयव्हीएफवर आधारित सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. महिलाप्रधान सिनेमा असल्यामुळे फक्त आणि फक्त करिना आणि कियाराचीच जास्त चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी याच सिनेमासारखा आणि एक हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव समोर आले नसले तरीही लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

 


सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन अभिनेत्री दिसत असल्या तरी ब्लँकेटद्वारे त्यांचे चेहरे त्यांनी झाकलेत. पूर्णपणे चेहरे लपवण्याचा हा एक सिनेमाचा प्रमोशन फंडा असल्याचे समोर आले आहे. डाव्या बाजूला आहे मराठमोठी अभिनेत्री सई ताम्हणकर तर उजव्या बाजुला आहे क्रिती सॅनन. यावरूनच तुम्हाला अंदाजा आला असणारच की, सई आता लवकरच क्रिती सॅननसह एक बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. महिलाप्रधान हा सिनेमा असून त्याची कथा महिलाच पुढे नेते. मराठीत आलेल्या 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारित हा सिनेमा असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल. 

सिनेमात सई आणि क्रिती सॅनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून  पुन्हा एकदा महिला प्रधान सिनेमा नवीन वर्षात 2020 मध्ये रसिकांना पाहायला मिळणार हे मात्र नक्की. गेल्या काही दिवसापांसून सिनेमाच्या शूटिंग लोकेशनचे फोटो सई तिच्या सोशल मीडियावर शेअर करत होती.त्याचवेळी तिने ती पुन्हा एकदा एका हिंदी सिनेमात झळकणार असल्याचे स्षष्ट झाले होते. तुर्तास या सिनेमाची कोणत्याही प्रकारीच माहिती समोर आलेली नसली तरी योग्य वेळ आल्यावर या सिनेमाची संपूर्ण माहिती रसिकांपर्यंत पोचेल. सध्या तरी सगळी काही माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. 
 

Web Title: In this photo one is a Marathi actress Sai Tamhankar and the other is a Bollywood actress Kriti Sanon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.