या व्यक्तीमुळे क्रांती रेडकरचे बदलले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 13:52 IST2017-09-23T08:12:10+5:302017-09-23T13:52:55+5:30
सध्या नवरात्री असून सगळे जण नवरात्रीच्या रंगात रंगले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने सगळेच सेलिब्रिटी आपल्या फॅन्ससाठी विविध फोटो, व्हिडिओ पोस्ट ...
.jpg)
या व्यक्तीमुळे क्रांती रेडकरचे बदलले आयुष्य
स ्या नवरात्री असून सगळे जण नवरात्रीच्या रंगात रंगले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने सगळेच सेलिब्रिटी आपल्या फॅन्ससाठी विविध फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला लुझरवाली गरबा स्टेप हा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. आता क्रांती तिच्या फॅन्ससाठी नवरात्रीची एक खास भेट घेऊन आली आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी खास व्यक्ती तरी असतात. प्रत्येक जणाचे त्या आपल्या आयुष्यातील खास व्यक्तिसोबतचे नाते खूपच वेगळे असते. क्रांती आता तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सांगणार आहे. तिनेच नुकतेच असे ट्वीट करून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. क्रांतीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ज्या स्त्रियांमुळे माझे आयुष्य बदलले त्या स्त्रिया या माझ्यासाठी दुर्गा आहेत आणि त्यातील नऊ स्त्रियांसोबत असलेले माझे फोटो मी नऊ दिवस पोस्ट करणार आहे.
या ट्वीटसोबत क्रांतीने तिचा तिच्या आईसोबत असलेला फोटो पोस्ट केला आहे. ज्या स्त्रीमुळे सगळ्यात जास्त क्रांतीचे आयुष्य बदलले ही तिची आई आहे, हे तिच्या ट्वीटवरून आपल्याला कळत आहे. तिच्या या ट्वीटवर क्रांती तू खूप चांगला विचार केला असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या फॅन्सनी दिल्या आहेत.
![kranti redkar mother]()
क्रांती रेडकरचा करार हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. आता क्रांतीचा रॉकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्रांती या चित्रपटात प्रेक्षकांना पोलिसांच्या भूमिकेत दिसणार असून कल्पना ढोबळे असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ती या चित्रपटात पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल देवची देखील मुख्य भूमिका आहे. राहुलचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्याने याआधी अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तो दिल बोले ऑबेरॉय या मालिकेतही झळकला होता.
Also Read : ...त्यांची अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान : क्रांती रेडकर