पॉलाने केली प्रियांकाची तारीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:20 IST2016-06-14T08:50:16+5:302016-06-14T14:20:16+5:30

             पिंडदान या रहस्यमय प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची परदेशी पण आता मराठी मातीत रंगलेली अभिनेत्री ...

Paul praised Kelly Priyanka | पॉलाने केली प्रियांकाची तारीफ

पॉलाने केली प्रियांकाची तारीफ

 

         पिंडदान या रहस्यमय प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची परदेशी पण आता मराठी मातीत रंगलेली अभिनेत्री पॉला मॅगलम सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. या चित्रपटातील काही गाणी गायिका प्रियांका बर्वे हिने गाऊन प्रेक्षकांच्या मनावर तिच्या आवाजाची जादु तिने बिखेरली आहे. प्रियांकाने अनेक मराठी चित्रपटांसाठी आवाज तर दिलाच आहे पण सध्या तिचे पिंडदानमधील कधी नी कसे हे गाणे प्रेक्षकांवर मोहिनी घालत आहे. पिंडदान ही एक रहस्यमय प्रेमकथा असल्याचे बोलले जात आहे. अन प्रेमकथा म्हटल्यावर आपसुकच रोमँटिक गाणी तर असणारच ना. तर या चित्रपटातील गाण्यांना मधुर आवाज देणाºया प्रियांकाची तारीफ या चित्रपटाची अभिनेत्री पॉलाने केली आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन फुल स्वींग मध्ये सुरु असुन यामध्ये अभिनेत्यांसोबतच गायक देखील सहभागी झाले आहेत. पिंडदान हे नाव लिहिलेले टि-शर्ट घालुन सर्वच टिम जोरात प्रमोशन करीत आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर याबाबत पॉलाने पोस्ट शेअर केली असुन प्रियांकाचे तिने कौतुक केले आहे. पॉला म्हणतीये, पिंडदान प्रमोशन विथ द टॅलेंटेड प्रियांका बर्वे. आता प्रियांकाने ज्या अभिनेत्रीली आपला आवाज दिला थेट तिच्याकडुनच प्रशंसा झाली म्हणजे विषयच संपला ना.  


Web Title: Paul praised Kelly Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.