गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल आता हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं स्वघरी परततेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 08:37 AM2018-03-16T08:37:17+5:302018-03-16T14:07:17+5:30

बॉलिवूडच्या या रंगीला गर्लचं मराठी पाऊल पुढं पडतेय म्हणत सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा या सिनेमातून मराठमोळी उर्मिलाने मराठी रुपेरी ...

For the past many years, the innocent girl who is Bollywood has returned to her self due to her work in Hindi. | गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल आता हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं स्वघरी परततेय!

गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल आता हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं स्वघरी परततेय!

googlenewsNext
लिवूडच्या या रंगीला गर्लचं मराठी पाऊल पुढं पडतेय म्हणत सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा या सिनेमातून मराठमोळी उर्मिलाने मराठी रुपेरी पडद्यावर मस्त मस्त एंट्री मारली आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.रूपेरी पडद्यावर आजोबा सिनेमा रसिकांनी अनुभवला आता छोट्या पडद्यावरही पुन्हा एकदा रंगीला गर्लचं दर्शन घडणार आहे.येत्या रविवारी झी टॉकीजवर 'आजोबा' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. आजोबा सिनेमामध्ये ड्रामा, सस्पेन्स, उत्कृष्ट संगीत, सुंदर सिनेमॅटोग्राफी, अप्रतिम अभिनय आणि मानवजातीचा संदेश यांचे परिपूर्ण मिश्रण आहे.या सिनेमात एका बिबट्याच्या कथा मांडण्यात आली आहे.उर्मिलाने सिनेमात विद्या अथरेया ही व्यक्तीरेखा साकारली आहे.तिनं बिबट्याच्या जीवनावर बराच अभ्यास केला असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या जंगला जंगला ती फिरते.अशी आजोबा सिनेमाची कथा आहे.या सिनेमासाठी उर्मिलानेही बरीच मेहनत घेतली होती बिबट्यांचा तिनंही बराच अभ्यास केला होता.शिवाय महाराष्ट्रातल्या बिबट्यांच्या संख्येवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.जेव्हा महाराष्ट्रातील मानव-बिबट्या संघर्ष चिंतेचा विषय ठरला होता कारण मानवी वसाहती मध्ये बिबट्या येण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या आणि आजोबा सारखी कथा निर्माण करणे ही त्या काळाची गरज होती. 'जर आपण प्राण्यांच्या वसाहती मध्ये फोटो काढण्यासाठी गेलो तर ते स्विकारले जाते पण जर ते पाण्याच्या शोधात आपल्या वसाहतीमध्ये आले तर मात्र त्यांना ठार मारले जाते',या वाक्यातच सिनेमाचा हेतू पूर्णपणे लपलेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा  'आजोबा सिनेमातून उर्मिलाच्या मराठीप्रेमासोबतच प्राणीप्रेमही रसिकांना अनुभवता येणार आहे. 


इतकंच नाहीतर छोट्या पडद्यासाठी सुद्धा उर्मिला काही नवीन नव्हती.हिंदी रिअॅलिटी शोमध्ये जज बनलेली उर्मिला मराठीतही त्याच भूमिकेत दिसून आली.मराठी सिनेमासोबतच 'मराठी पाऊल पडते पुढे' म्हणत महाराष्ट्राच दडलेली कलेची खाण आणि कलाकार शोधणारी रत्नपारखी जज म्हणूनही ती अवतरली होती.'आजोबा' सिनेमाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर अभिनयाच्या दृष्टीने उर्मिलाचे हे पहिले पाऊल असले तरी याआधीही 'हृदयनाथ' सिनेमात ती एका मराठमोळ्या लावणीवर थिरकली होती.

Web Title: For the past many years, the innocent girl who is Bollywood has returned to her self due to her work in Hindi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.