पल्लवी पाटीलने शेअर केला नवा फोटो, फॅन्स म्हणाले - ब्युटीफूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 16:36 IST2020-05-08T14:31:33+5:302020-05-08T16:36:25+5:30

पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात.

Pallavi patil share hot photo on Instagram gda | पल्लवी पाटीलने शेअर केला नवा फोटो, फॅन्स म्हणाले - ब्युटीफूल

पल्लवी पाटीलने शेअर केला नवा फोटो, फॅन्स म्हणाले - ब्युटीफूल

अभिनेत्री पल्लवी पाटीलने 'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असून ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने काही महिन्यांपूर्वी वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.


तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. पल्लवीने आणखी एक हॉट फोटो शेअर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. लाल रंगाच्या या फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करले असाच आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या चाहत्यांकडून होत आहे. 


याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यासोबतच भारतीय पेहरावातील देखील पल्लवीचे फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांची तितकीच पसंती मिळते. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात.

 

Web Title: Pallavi patil share hot photo on Instagram gda