‘प्रोजक्ट मराठवाडा’ मध्ये ओम पुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 12:05 IST2016-05-25T06:35:20+5:302016-05-25T12:05:20+5:30
बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांचं नाव त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत फार प्रसिध्द आहे. ओम पुरी आता ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ या आगामी ...

‘प्रोजक्ट मराठवाडा’ मध्ये ओम पुरी
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांचं नाव त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत फार प्रसिध्द आहे. ओम पुरी आता ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ या आगामी चित्रपटामध्ये शेतक-याच्या भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात दुष्काळ परिस्थितीमुळे तेथील शेतक-यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढलं आहे. या परिस्थितीवरच ‘प्रोजक्ट मराठवाडा’ हा चित्रपट आधारित आहे.
‘प्रोजक्ट मराठवाडा’ चा पहिला टिझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला. ओम पुरीसोबत सिमा बिसवास, दलीप तहील आणि गोविंद नामदेव आदी कलाकारांचा पण अभिनय यामध्ये आहे. येत्या ३ जून रोजी ‘प्रोजक्ट मराठवाडा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.