"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 11:24 IST2023-12-21T11:23:57+5:302023-12-21T11:24:08+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला.

"Now I know...", actress Pooja Sawant got romantic with her husband-to-be, the post is in discussion | "आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत

"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. फोटो पाहिल्यानंतर तिचा भावी नवरा कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. नंतर पूजाने त्याचा चेहरा दाखवत त्याची ओळख करुन दिली. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या चर्चेत आला आहे.

अभिनेत्री पूजा सावंत हिने इंस्टाग्रामवर सिद्धेश चव्हाणसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सिद्धेशच्या मांडीवर बसून त्याच्या डोळ्यात पाहताना दिसत आहे. हा खूपच रोमँटिक फोटो आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, आता मला कळलं, मी कुठे असले पाहिजे. माझी जागा तुझ्या हृदयात आहे. या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

पूजाने सिद्धेश चव्हाण सोबतचे नाते नेहमीच गुपित ठेवले होते. तिच्या प्रेमाबद्दल कोणालाच कानोकान खबरही लागली नाही. मात्र इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याबद्दल माहित होते. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच तो विदेशात राहतो या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही.

वर्कफ्रंट...
अभिनेत्री पूजा सावंत हिने मराठीसोबत बॉलिवूडमध्येही काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील ती आघाडीची अभिनेत्री आहे. तिने क्षणभर विश्रांती चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने काम केले आहे. तसेच तिने जंगली या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Web Title: "Now I know...", actress Pooja Sawant got romantic with her husband-to-be, the post is in discussion