अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता हा मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात... पाहा त्याच्या लग्नाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 12:52 IST2017-12-13T07:22:03+5:302017-12-13T12:52:03+5:30
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. यांच्या लग्नानंतर आता एक मराठी अभिनेता लग्नबंधनात ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता हा मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात... पाहा त्याच्या लग्नाचे फोटो
अ ुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. यांच्या लग्नानंतर आता एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे.
निर्मिती सावंत यांनी गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. त्यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदीमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. निर्मिती सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा अभिनय देखील याच क्षेत्रात सध्या आपले नशीब आजमावत आहे. अभिनयने श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात काम केले होते. तसेच नकटीच्या लग्नाला यायचं हा या त्याच्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत त्याने नुपूर म्हणजेच प्राजक्ता माळीच्या भावाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
![abhinay sawant marriage]()
अभिनयचे नुकतेच लग्न झाले असून त्याने पूर्वा पंडित या त्याच्या मैत्रिणीशी गाजतवाजत लग्न केले. पूर्वा ही देखील अभिनेत्री असून तिने रंगभूमीवर काम केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून तिने शिक्षण घेतले आहे. अभिनय आणि पूर्वाच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. रेणुका शहाणे, आशुतोष राणा, सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, चिन्मयी सुमीत, शुभांगी गोखले, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, कविता लाड, वरद चव्हाण, प्राजक्ता माळी यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. अभिनयच्या लग्नात रेणुका शहाणेचा तर एख वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. रेणुका शहाणेने या लग्नात नऊवारी घातली असून ती खूपच छान दिसत होती. तिनेच या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अभिनय आणि पूर्वाचा साखरपुडा ८ ऑक्टोबरला झाला होता. त्यांच्या साखरपुड्याला देखील मराठी इंडस्ट्रीतील अनेकजण उपस्थित होते. पूर्वाने तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर तिचा आणि अभिनयचा साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून अभिनयच्या फॅन्सना ही गोड बातमी दिली होती.
![renuka shahane ashutosh rana]()
![abhinay sawant marriage]()
![abhinay sawant marriage]()
![abhinay sawant marriage]()
Also Read : अभिनय सावंतच्या भावी पत्नीने दिले खास सरप्राईज,वाढदिवसाचं असं केलं जंगी सेलिब्रेशन