नितीन देसाईंच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; लाडक्या कलादिग्दर्शकाला अखेरचा निरोप देताना सेलिब्रिटीदेखील झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 18:25 IST2023-08-04T18:11:21+5:302023-08-04T18:25:43+5:30

नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Nitin desai last rituals nd studio karjat mumbai Celebrities also got emotional | नितीन देसाईंच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; लाडक्या कलादिग्दर्शकाला अखेरचा निरोप देताना सेलिब्रिटीदेखील झाले भावूक

नितीन देसाईंच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; लाडक्या कलादिग्दर्शकाला अखेरचा निरोप देताना सेलिब्रिटीदेखील झाले भावूक

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी कष्टाने उभारलेल्या कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतला. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला.  त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. यावेळी कला विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

नितीन देसाई यांना त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने खांदा दिला. आपल्या लाडक्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देताना तिच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

आशुतोष गोवारिकर, आमिर खान, मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह मराठी सिनेइंडस्ट्रीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल साने यांनी अंत्यदर्शन घेतले. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाले. 

नितीन देसाई यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यांनी एका चिठ्ठीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की, माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा. 'जोधा अकबर' चित्रपटाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
 

Web Title: Nitin desai last rituals nd studio karjat mumbai Celebrities also got emotional