​ लैंगिक छळाच्या बातम्यांनी निकिता भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 16:10 IST2016-04-01T23:10:07+5:302016-04-01T16:10:07+5:30

आपल्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी मॉडेल निकिता गोखले प्रसार माध्यमांवर चांगलीच संतापली आहे. निकितावर  लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी ...

The news of sexual harassment spreads out | ​ लैंगिक छळाच्या बातम्यांनी निकिता भडकली

​ लैंगिक छळाच्या बातम्यांनी निकिता भडकली

ल्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी मॉडेल निकिता गोखले प्रसार माध्यमांवर चांगलीच संतापली आहे. निकितावर  लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी मीडियात अलीकडे उमटली होती. या बातम्या देणाºया मीडियावर निकिता जाम भडकलीयं. प्लेबॉय या मॅगझिनसाठी टेस्ट न्यूड फोटोशूट केल्यामुळे निकिता चांगलीच चर्चेत आली होती. फेसबुकवरून निकिताने आपला संताप व्यक्त केला आहे. बालपणी माझे लैंगिक शोषण झाल्याचा बातम्यांमुळे मी माध्यमांवर नाराज आहे. या बातम्या २०१४ मध्येच येऊन गेल्या होत्या. ते सगळे मी विसरले आहे. तरिही माध्यमे तेच तेच उखरून काढत आहे. मला याबाबत जाहिरपणे काहीही बोलायला आवडणार नाही, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. बाललैंगिक शोषणाला बळी पडणे ही काही हेडलाईन असू शकत नाही, असा शब्दांत तिने माध्यमांवर आखपाखड केली आहे. निकिता ही मूळची नागपुरची आहे. मिस इंडिया बिकिनी२०१५ आणि मिस वर्ल्ड बिकिनी२०१५ मध्ये तिने भाग घेतला होता.
 अ

Web Title: The news of sexual harassment spreads out