नवीन नवरीचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 13:55 IST2016-12-11T13:55:51+5:302016-12-11T13:55:51+5:30

लग्न असो या पार्टी कुठे ही जाताना आपला हटके लूक असावा असे प्रत्येकाला वाटत असते. अशा हटक्या लूकसाठी प्रत्येकजण ...

The new bride's little look | नवीन नवरीचा हटके लूक

नवीन नवरीचा हटके लूक

्न असो या पार्टी कुठे ही जाताना आपला हटके लूक असावा असे प्रत्येकाला वाटत असते. अशा हटक्या लूकसाठी प्रत्येकजण जोरदार तयारीदेखील लागला असतो. अशावेळी जर नवीन नवरी असेल तर वाह मग काही तिचा रूबाबच निराळा असतो. अशीच मराठी चित्रपटसृष्ट्रीची नवीन नवरी एका हटके लूकमध्ये पाहायला मिळाली. ही नवीन नवरी आहे अभिनेत्री श्रुती मराठे. काही दिवसांपूर्वीच  अभिनेत्री श्रुती मराठे ही अभिनेता गौरव घाटणेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर या दोघांनी थेट जीममधील एक सेल्फी सोशलमीडियावर अपलोड केला होता. आता ही जोडी थेट एक कार्यक्रमात पाहायला मिळाली. मात्र यावेळी श्रुती एकदम हटके लूकमध्ये दिसली आहे. श्रुतीने यावेळी लाल रंगाचा क्रॉप स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. तिने तिचे हे सुंदर फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहे. तसेच सुपर सेक्सी क्रॉप स्कर्ट म्हणून तिने तिच्या स्कर्टचे कौतुक केलेले सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. या नवीन नवरीच्या लूकला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच ही स्टाईल श्रद्धा ओझा यांची असल्याचेदेखील तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. श्रुती आणि गौरवची  एका चित्रपटाच्या माध्यमातून  मैत्री झाली आहे. त्यांच्या या मौत्रिचे रूपांतर प्रेमात झाले आहे. आता ही रिल लाईफ जोडी रियल लाईफमध्येदेखील उतरली आहे. श्रुतीने यापूर्वी राधा ही बावरी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तर गौरव घाटणेकर याने तुझविन सख्या रे या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. असे प्रेक्षकांचे दोन लाडके कलाकार विवाहबंधनात अडकल्याने त्यांचे चाहतेदेखील खूप आनंदित झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. 














Web Title: The new bride's little look