नेहा पेंडसाच्या पतीचा यापूर्वी दोनदा झाला आहे घटस्फोट; पाहा एका लग्नाची तिसरी गोष्ट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 18:18 IST2020-01-07T18:08:56+5:302020-01-07T18:18:05+5:30

नेहाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे.

Nehha pendse husband has 2 kids from 2 earlier marriages shardul | नेहा पेंडसाच्या पतीचा यापूर्वी दोनदा झाला आहे घटस्फोट; पाहा एका लग्नाची तिसरी गोष्ट..

नेहा पेंडसाच्या पतीचा यापूर्वी दोनदा झाला आहे घटस्फोट; पाहा एका लग्नाची तिसरी गोष्ट..

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला शार्दुल सिंग बयास याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पुण्यात मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. नेहाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले होते. नेहाने लग्नात घेतला उखाणा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


 नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा व शार्दुल एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आजतकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान नेहाने पती शार्दुलबाबत मनमोकळ्या गप्पा मरायला. नेहाशी लग्नाआधी शार्दुलची दोन लग्न झाली आहेत. त्याला दोन मुलीदेखील आहेत. या सर्व गोष्टी नेहाला माहिती असल्याचे तिने सांगितले.

 

नेहा म्हणाली, ''मला शार्दुलबाबत सगळं

काही माहिती आहे. शार्दुलचे जर याआधी दोन लग्न झाली असली तरी त्याचा जीवनाचा दृष्टीकोन बदललेला नाही. शार्दुलने सर्वकाही व्यवस्थित संतुलित केले आहे. '' 

लग्नाच्या एक दिवस अगोदर नेहाचा साखरपुडा झाला. तिथेच संगीत सेरेमनीमध्येही नेहा आणि शार्दुलने मस्ती केली. या दोन्ही फंक्शनचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.


नेहाबद्दल सांगायचे तर तिने नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते.

Web Title: Nehha pendse husband has 2 kids from 2 earlier marriages shardul