आता हेच ऐकणं बाकी होतं ! लग्नाआधीच या मराठमोळ्या अभिनेत्रीला आहेत दोन मुली, तिनेच सांगितल्या होत्या या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 15:32 IST2020-07-08T15:31:18+5:302020-07-08T15:32:10+5:30

शार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. शार्दुलचं हे तिसरं लग्न आहे आणि तो दोन मुलींचा पिता आहे.

Nehha Pendse Has Two Daughter Before Marry Tto Shardul Shardul Singh Bayas | आता हेच ऐकणं बाकी होतं ! लग्नाआधीच या मराठमोळ्या अभिनेत्रीला आहेत दोन मुली, तिनेच सांगितल्या होत्या या गोष्टी...

आता हेच ऐकणं बाकी होतं ! लग्नाआधीच या मराठमोळ्या अभिनेत्रीला आहेत दोन मुली, तिनेच सांगितल्या होत्या या गोष्टी...

बिंधास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे. 05 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकली. उद्योगपती शार्दुल सिंहसोबत नेहानं मराठमोळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो आणि सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. मात्र त्यानंतर वेगळ्याच चर्चांना सुरूवात झाली होती. नेहानं तिच्या पतीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. जे ऐकल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

पती शार्दुल याचा आधी दोन वेळा घटस्फोट झालाच्या चर्चांना जोर आला होता. त्यावर बोलताना, शार्दुलचा दोनदा घटस्फोट आणि त्याला आधीच्या लग्नांपासून दोन मुली आहेत, तर काय झालं? मीही व्हर्जिन नाही, असं सडेतोड उत्तर नेहाने देताच सा-यांनाच धक्का बसला होता. नेहानं तिच्या आणि शार्दुलच्या लव्ह लाइफपासून ते लग्नापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.  

शार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. शार्दुलचं हे तिसरं लग्न आहे आणि तो दोन मुलींचा पिता आहे. मला त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सर्व माहित होतं आणि असे तिने सांगितले होते.

Web Title: Nehha Pendse Has Two Daughter Before Marry Tto Shardul Shardul Singh Bayas