होणारा नवरा झाला ट्रोल, संतापलेल्या नेहा पेंडसेने असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 10:47 IST2019-09-16T10:41:10+5:302019-09-16T10:47:45+5:30

नेहा पेंडसे लवकरच बॉयफ्रेन्ड शार्दुल सिंगसोबत लग्न करतेय. काही दिवसांपूर्वी शार्दुलसोबतचा फोटो शेअर करत, तिने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण अनेकांनी हा फोटो पाहून नेहाच्या बॉयफ्रेन्डला ट्रोल करणे सुरु केले.

nehha pendse give trollers ans who troll her boyfriend | होणारा नवरा झाला ट्रोल, संतापलेल्या नेहा पेंडसेने असे दिले उत्तर

होणारा नवरा झाला ट्रोल, संतापलेल्या नेहा पेंडसेने असे दिले उत्तर

ठळक मुद्देआम्ही 2020 च्या सुरूवातीला लग्न करणार आहोत. महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होईल, असे तिने सांगितले.

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 12 ची स्पर्धक नेहा पेंडसे लवकरच बॉयफ्रेन्ड शार्दुल सिंगसोबत लग्न करतेय. काही दिवसांपूर्वी शार्दुलसोबतचा फोटो शेअर करत, तिने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण अनेकांनी हा फोटो पाहून नेहाच्या बॉयफ्रेन्डला ट्रोल करणे सुरु केले. याचे कारण म्हणजे, शार्दुलचे वजन. आता नेहाने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे.


बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नेहा यावर बोलली. ‘शार्दुलच नाही तर मलाही अनेकदा ट्रोल केले गेले आहे. ‘मे आय कम इन मॅडम’ या शोदरम्यान माझे वजन वाढले होते. यामुळे अनेक लोकांनी मला ट्रोल केले.  प्रेक्षक म्हणून तुम्ही कलाकारांच्या लूकवर कमेंट करू शकता. पण कुणाला लक्ष्य करू शकत नाही. कदाचित एखादी व्यक्ती कुठल्या फिजिकल, इमोशनल वा अन्य कुठल्या हेल्थ प्रॉब्लेसने ग्रस्त असेल. अशावेळी सरसकट वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल करणे चुकीचे आहे. शार्दुलचा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. तो एक बिझनेसमॅन आहे. अशात त्याला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. तुला हाच भेटला का? अशा कमेंट करणे चुकीचे आहे,’ असे नेहा म्हणाली.


नेहा इथेच थांबली नाही तर शार्दुल कसा आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तो मला किती आनंदी ठेवतो हे तुम्ही जाणता का? तो माझ्यासाठी योग्य आहे की नाही, हे ठरवणारे तु्ही कोण? असे सवालही तिने ट्रोलर्सला केलेत. काही लोक अशा कमेंट्स करून आपले फ्रस्टेशन काढतात. काही स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी असले उद्योग करतात. काहींच्या आयुष्यात अशा गोष्टी करण्याशिवाय दुसरे काहीच नसते, असे ट्रोलर्सला उद्देशून ती म्हणाली.


दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर मला शार्दुलच्या रूपात एक खरी व्यक्ती मिळाली. ट्रोलर्समुळे मी त्याला गमावू इच्छित नाही, असेही ती म्हणाली. लग्नाचा प्लानही तिने सांगितला. आम्ही 2020 च्या सुरूवातीला लग्न करणार आहोत. महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होईल, असे तिने सांगितले.

Web Title: nehha pendse give trollers ans who troll her boyfriend