Nehha Pendse Birthday : नेहा पेंडसे बर्थडे सेलिब्रेशनवेळी नवऱ्यासोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:00 IST2021-11-29T16:59:24+5:302021-11-29T17:00:04+5:30

नेहा पेंडसे आज ३७वा वाढदिवस साजरा करते आहे.

Nehha Pendse Birthday: Neha Pendse appeared with her husband during the birthday celebration in a romantic guess, watch this video | Nehha Pendse Birthday : नेहा पेंडसे बर्थडे सेलिब्रेशनवेळी नवऱ्यासोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पाहा हा व्हिडीओ

Nehha Pendse Birthday : नेहा पेंडसे बर्थडे सेलिब्रेशनवेळी नवऱ्यासोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पाहा हा व्हिडीओ

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. आज नेहा ३७वा वाढदिवस साजरा करते आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहा आणि तिचा नवरा शार्दुल बयास रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

नेहा पेंडसे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करून लिहिले की, तुझ्यासोबत असताना कधीच कंटाळवाणे वाटत नाही.


या व्हिडीओसोबतच नेहा पेंडसेने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. 


 नेहा पेंडसे हिने शार्दूल बयासशी ५ जानेवारी २०२० रोजी लग्न केले होते. पुण्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने दोघांचे लग्न झालं होते. लग्नात तिने नऊवारी साडी नेसली होती. शार्दूलचे यापूर्वी दोन विवाह आणि घटस्फोट झाले असल्याचा आणि त्याला दोन मुली असल्याचा खुलासा लग्नानंतर झाला होता. त्यामुळे नेहा पेंडसेला खूप ट्रोल केले होते. 
अभिनेत्री नेहा पेंडसे शेवटची जून चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने आगामी चित्रपट रावसाहेबची घोषणा केली होती. या चित्रपटाची निर्मिती नेहाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Nehha Pendse Birthday: Neha Pendse appeared with her husband during the birthday celebration in a romantic guess, watch this video