n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री म्हटले की, सौदर्य हे आलेच. या सौदर्यासाठी अभिनेत्रींना अपडेट राहणे खूपच महत्वाच असते. तसेच आपला ड्रेस, हेअरस्टाइल या गोष्टींना अधिक महत्त्व देताना या अभिनेत्री दिसत असतात. कारण केसांमुळे मुलींचे सौदर्य अधिक खुलून दिसते असे मानले जाते. म्हणूनच वन वे तिकीट, कॉफी आणि बरचं काही या चित्रपटातून प्रेक्षकांचे मने जिंकणारी अभिनेत्री नेहा महाजन हिने आपल्या सौदर्यासाठी हेअरस्टाइलवर प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर हेअर स्टाइल करतानाचा फोटो अपलोड केला आहे. या फोटोद्वारे नेहा सांगते, कर्ली केस करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. नेहाचे हे प्रयत्न पाहता तिची ही कर्ली हेअरस्टाइल नक्कीच तिच्या सौदर्यात भर पाडेल अशी आशा करुया नेहा सध्या वन वे तिकीट या चित्रपटाच्या प्रिमीअर शोसाठी सिंगापूरमध्ये असल्याचे समजत आहे. बहुतेक सिंगापूरच्या प्रेक्षकांची मने जिंकण्याचा हा प्रयत्न आहे दिसतो आहे.
![]()
Web Title: Neha's efforts for hairstyles
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.