नेहा पेंडसेचा BOLD व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहते झाले क्लीन बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:46 IST2022-10-27T11:46:25+5:302022-10-27T11:46:52+5:30

Nehha Pendse : स्किन टाइट ड्रेसमधील नेहा पेंडसेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Neha Pendse's BOLD video is going viral, fans are clean bold! | नेहा पेंडसेचा BOLD व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहते झाले क्लीन बोल्ड!

नेहा पेंडसेचा BOLD व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहते झाले क्लीन बोल्ड!

अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) हिने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटो शेअर करत असते. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत, या व्हिडीओंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून लिहिले, टिक टिक. या व्हिडीओत नेहाने बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. हा आउटफिट स्कीन कलरचा असून त्यावर मोती लागलेले दिसत आहे. या व्हिडीओत नेहा वेगवेगळ्या अदा दाखवताना दिसते आहे. तिने मोठी रिंग घातली आहे. तसेच हाय हिल्सची सॅण्डलही घातली आहे. केस मोकळे सोडले आहेत. स्किन टाइट ड्रेस असल्याने ती एकदम किलर पोज देताना दिसते आहे. तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.


नेहा पेंडसेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. त्याला १ तासात १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेहाच्या या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. याआधीही त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला 74 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले होते. 


नेहा पेंडसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मे आय कम इन मॅडम या लोकप्रिय मालिकेत ती संजनाची भूमिका साकारत आहे. ही एक कॉमेडी मालिका आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडते आहे.

Web Title: Neha Pendse's BOLD video is going viral, fans are clean bold!