मराठीतील हॉट अभिनेत्री नेहा पेंडसेचा विना मेकअप लूकमधील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 13:18 IST2020-05-02T13:12:58+5:302020-05-02T13:18:45+5:30
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

मराठीतील हॉट अभिनेत्री नेहा पेंडसेचा विना मेकअप लूकमधील फोटो व्हायरल
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. काही महिन्यापूर्वी नेहाने लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर नेहा नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.
नेहाने नुकतेच तिचा नो मेकअप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नेहा विना मेकअपसुद्धा तितकीच खूपच सुंदर दिसते आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. फोटोमधील नेहाचे सोज्वळ सौंदर्य कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते.