आली लहर केला कहर, या अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट पाहून हटणार नाही तुमची नजर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 10:50 IST2019-10-21T10:45:07+5:302019-10-21T10:50:35+5:30
हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू तिने दाखवली आहे.

आली लहर केला कहर, या अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट पाहून हटणार नाही तुमची नजर !
अभिनेत्री नेहा पेंडसे वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. आता तर नेहा तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. एक बिनधास्त जीवन जगणारी मुलगी अशी नेहाची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका,नेहाला जे आवडते ते ती करते. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू तिने दाखवली आहे.
करिअरप्रमाणे तिच्या खाजगी आयुष्यावरही चर्चा रंगतात. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे ती चर्चेत आहे. तर आता ती तिच्या खास ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा सुपरहॉट अंदाज पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नेटीझन्स नेहाचे हे फोटो पाहून त्यांच्या नजरा याच फोटोवर खिळल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नेहा पेंडसे सिनेसृष्टीत काम करते आहे.तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते.
बॉयफ्रेन्ड शार्दुल सिंगसोबत लग्न करतेय. काही दिवसांपूर्वी शार्दुलसोबतचा फोटो शेअर करत, तिने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण अनेकांनी हा फोटो पाहून नेहाच्या बॉयफ्रेन्डला ट्रोल करणे सुरु केले. याचे कारण म्हणजे, शार्दुलचे वजन. आता नेहाने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर मला शार्दुलच्या रूपात एक खरी व्यक्ती मिळाली. ट्रोलर्समुळे मी त्याला गमावू इच्छित नाही, असेही ती म्हणाली. लग्नाचा प्लानही तिने सांगितला. आम्ही 2020 च्या सुरूवातीला लग्न करणार आहोत. महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होईल, असे तिने सांगितले.