"मी eggs फ्रीज केलेत, पण आता मला मूल नकोय...", नेहा पेंडसे असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:30 IST2026-03-03T15:29:44+5:302026-03-03T15:30:11+5:30

नेहा पेंडसेचं वक्तव्य चर्चेत

neha pendse says i froze my eggs but now i dont want to be a mother reveals reason behind it | "मी eggs फ्रीज केलेत, पण आता मला मूल नकोय...", नेहा पेंडसे असं का म्हणाली?

"मी eggs फ्रीज केलेत, पण आता मला मूल नकोय...", नेहा पेंडसे असं का म्हणाली?

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी तसंच हिंदी मनोरंजनविश्वात सर्वांच्याच परिचयाची आहे. हिंदीतली 'मे आय कम इन मॅडम' मालिका असो किंवा मराठीतली 'भाग्यलक्ष्मी' या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. नेहाने मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं. २०२० साली तिने बिझनेसमन शार्दुल बायससोबत लग्न केलं. तिच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. 'मला आई व्हायचं नाही' असं तिने नुकतंच स्पष्ट केलं. नेहा असं का म्हणाली? वाचा

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेहा पेंडसे म्हणाली,  "मला आई व्हायचं नाही. लग्नाला सहा वर्ष झाली पण मला आई होण्याची इच्छा नाही. हा काही मी एका झटक्यात घेतलेला निर्णय नाही. मी माझे eggs फ्रीज केले आहेत. कारण लग्नानंतर मला एका पॉइंटला आई व्हायची तीव्र इच्छा झाली होती. पण तेव्हा मी आई होऊ शकले नाही. त्या प्रक्रियेत मी खूप निराश झाले होते."

ती पुढे म्हणाली, "मी इतकी वैतागले की 'नाही, आता मला आई नाही व्हायचंय' असं मी म्हणायला लागले. मग असं वाटलं की कदाचित मी हे आत्ता रागात म्हणत असेन नंतर माझा विचार बदलूही शकतो. आपण eggs फ्रीज करुन घेऊ आणि वाटलं पुढे तर करु. पण सध्या या पॉइंटला मला ती जबाबदारी नकोय. मी हे इतकं मोकळेपणाने बोलतीये कारण मला माहितीये माझ्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या या निराशेतून जात असतील. कोणीतरी खरं बोलण्याची गरज आहे."

नेहा आता ४१ वर्षांची आहे. ती शेवटची 'जून' या मराठी सिनेमात दिसली. ती पुन्हा मराठी इंडस्ट्रीत सक्रीय झालेली दिसत आहे. दुसरीकडे नेहाचा नवरा शार्दुल बायसचं आधी दोन लग्न झालं होतं. दोन्ही लग्नातून त्यांना एक एक मुली आहेत. नेहाचा दोन्ही सावत्र लेकींसोबत चांगला बाँड आहे. 

Web Title : नेहा पेंडसे ने एग्स फ्रीज किए, मातृत्व पर अपना रुख स्पष्ट किया।

Web Summary : अभिनेत्री नेहा पेंडसे, जिन्होंने शार्दुल बायस से शादी की है, ने खुलासा किया कि उन्होंने अपने एग्स फ्रीज कर लिए हैं, लेकिन उन्हें मातृत्व की इच्छा नहीं है। उन्होंने अतीत में प्रजनन क्षमता के साथ अपने संघर्षों और अपनी वर्तमान संतुष्टि को खुलकर साझा किया, उम्मीद है कि वह समान दुविधाओं का सामना कर रही अन्य महिलाओं के साथ प्रतिध्वनित होंगी। उन्होंने मराठी फिल्म उद्योग में अपनी सक्रिय भूमिका पर जोर दिया।

Web Title : Neha Pendse freezes eggs, clarifies her stance on motherhood.

Web Summary : Actress Neha Pendse, married to Shardul Bayas, reveals she's frozen her eggs but doesn't desire motherhood. She candidly shares her past struggles with fertility and her current contentment, hoping to resonate with other women facing similar dilemmas. She emphasizes her active role in the Marathi film industry.