गिरिजा ओकचा साधेपणा! बाजारात भाजी विकत घेताना दिसली अभिनेत्री, 'नॅशनल क्रश'वर चाहते पुन्हा फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:15 IST2025-11-17T11:14:33+5:302025-11-17T11:15:26+5:30
गिरिजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत: भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजा ओकचा साधेपणा पाहून चाहते थक्क झाले आहेत.

गिरिजा ओकचा साधेपणा! बाजारात भाजी विकत घेताना दिसली अभिनेत्री, 'नॅशनल क्रश'वर चाहते पुन्हा फिदा
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही सध्या चर्चेत आहे. गिरिजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे अभिनेत्री रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. त्यानंतर गिरिजाने तिच्या भावना व्यक्त करत चाहत्यांचे आभार मानले होते. त्यासोबतच काही Ai फोटोही व्हायरल झाल्याने अभिनेत्रीने निराशा व्यक्क केली होती. आता गिरिजाने नवीन पोस्ट केली आहे. ज्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गिरिजाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टला तिने "घर का खाना" असं कॅप्शन दिलं आहे. गिरिजाने जेवणाच्या ताटाचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वरणभात, भाजी, चटणी, अळूवडी हे पदार्थ दिसत आहे. गिरिजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत: भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजा ओकचा साधेपणा पाहून चाहते थक्क झाले आहेत. व्हायरल झाल्यानंतरही अभिनेत्री स्वत: भाजी खरेदी करत असल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीच्या साधेपणावर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
दरम्यान, गिरिजा ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. गिरिजाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदीतही काम केलं आहे. अभिनेते गिरिष ओक यांची गिरिजा मुलगी आहे. अनेक जाहिरातींमध्ये गिरिजा झळकली. शाहरुख खानच्या जवान सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.