सोशल मीडियाच्या अंगणात 'नाच रे मोरा' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:06 IST2019-02-05T17:02:17+5:302019-02-05T17:06:05+5:30

'भाई -व्यक्ती की वल्ली' ह्या सिनेमाचा उत्तरार्ध येत्या 9 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय. पु.ल. देशपांडे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ''नाच रे मोरा'' ह्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला.

Nach Re Mora Song From Bhaai Vyakti Ki Valli Marathi Movie Superhit On Social Media | सोशल मीडियाच्या अंगणात 'नाच रे मोरा' !

सोशल मीडियाच्या अंगणात 'नाच रे मोरा' !

'भाई -व्यक्ती की वल्ली' ह्या सिनेमाचा उत्तरार्ध येत्या 9 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय . पु.ल. देशपांडे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ''नाच रे मोरा'' ह्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला.

भाई सिनेमाच्या पहिल्या भागातही ''कानडा राजा पंढरीचा'' ह्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता . या सिनेमाच्या निमित्ताने ‘कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं पाहायला मिळले होते. ह्या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

पहिल्या भागातील जुगलबंदीला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता दुसरा भाग प्रदर्शित होताना नव्याने 'नाच रे मोरा हे गाणे रसिकांना अनुभवता येणार आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'भाई' सिनेमाच्या पूर्वाधात पु.लं.ची व्यक्तिरेखा  अभिनेता सागर देशमुखने साकारली होती.  त्याच्या भूमिकेचे सर्वच स्तरावरून विशेष कौतुक करण्यात आले होते. आता उत्तरार्धात विजय केंकरे वृध्दावस्थेतील पुलंची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. 

 

 

Web Title: Nach Re Mora Song From Bhaai Vyakti Ki Valli Marathi Movie Superhit On Social Media