माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम गेली ब्रेकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 18:09 IST2017-04-29T12:39:38+5:302017-04-29T18:09:38+5:30
शर्मिला राजाराम सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनी या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिच्या या भूमिकेला सध्या ...
.jpg)
माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम गेली ब्रेकवर
श ्मिला राजाराम सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनी या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिच्या या भूमिकेला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ही डेली सोप असल्याने तिला तिच्या दिवसातील अधिकाधिक वेळ हा चित्रीकरणाला द्यावा लागतो. पण या मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून ती नुकतीच तिच्या गावी गेली होती.
आपले गाव असावे, गावात एक छानसे शेत असावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण ही सगळ्यांची इच्छा काही पूर्ण होत नाही. पण शर्मिलाच्या गावात तिचे एक भलेमोठे शेत आहे. शर्मिलाने फेसबुक या सोशल नेटवर्किंगला टाकेल्या फोटोंमधून आपल्याला हे कळत आहे.
शर्मिला गावी गेल्यानंतर तिने गावचा फेरफटका मारला आहे. पण त्याचसोबत ती त्यांच्या शेतातदेखील गेली होती. शेतात तिने खूप सारी मजा-मस्ती केली असून तिथे खूप सारे फोटो देखील काढले आहेत आणि तिच्या या फोटोसेशनमधील काही फोटो फेसबुकला पोस्ट केले आहेत. शर्मिलाचे गाव जुन्नरमधील खोदाद हे आहे. तिथे त्यांचे मोठे शेत असून या शेतातील फोटो तिने फेसबुकला टाकले आहेत. एवढेच नव्हे तर तिने तिच्या शेतात पिकणाऱ्या कांद्यांचा फोटोदेखील टाकला आहे आणि पाहा आमच्या शेतात हे कांदे पिकतात. या कांद्यांचा वापर जेवण करण्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो असेदेखील म्हटले आहे. शर्मिलाने चित्रीकरणातून वेळ काढून खूप चांगला वेळ आपल्या कुटुंबियांसोबत गावात घालवला आहे हेच तिच्या फोटोंवरून आपल्याला दिसून येत आहे.
शर्मिलाने टाकलेल्या फोटोंना तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आतापर्यंत तिचे फोटो लाइक केले असून त्यावर खूप जणांनी कमेंटदेखील केले आहे.