शेतक-यांच्या संवेदना मांडणार मुळशी डॉट कॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 17:01 IST2016-09-23T11:05:19+5:302016-09-23T17:01:34+5:30

प्रियांका लोंढे                     लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या चित्रपटातून ...

Mulshi.com complies with the farmers' condolences | शेतक-यांच्या संवेदना मांडणार मुळशी डॉट कॉम

शेतक-यांच्या संवेदना मांडणार मुळशी डॉट कॉम

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">प्रियांका लोंढे
   
                लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या चित्रपटातून अनेक ज्वलंत विषय मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा असाच काळजाला भिडणारा विषय घेऊन प्रविण तरडे चित्रपट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावर तर सगळेच बोलतात, परंतू त्यांच्या मुलांच्या संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीच करीत नाही. स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनी हातून गेल्यावर नैराशाने किंवा सुडाच्या भावनेने पेटलेल्या शेतक-यांच्या मुलांची गोष्ट मांडणारा 'मुळशी डॉट कॉम' चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. १९९०-९२ च्या काळात मुळशी तालुक्यातील अनेक शेतक-यांनी आयटी पार्क, एमआयडीसी, हिल स्टेशन उभारण्यासाठी काही जणांना त्यांच्या जमिनी विकल्या. त्यावेळी भरमसाठ दागिने, गाड्या, मुलींची लग्न थाटामाटात या शेतक-यांनी केली. परंतू जसा पैसा आला तसाच तो झटक्यात गेलाही. कालांतराने या शेतक-यांची मुले मोठी झाली आणि आपल्या शेतजमिनी आपल्याला फसवून कोणीतरी बळकावल्याचा  राग त्यांच्या मनात निर्माण झाला. मग राजकिय पक्षाचे नेते, आयटी, सरकार यांच्याविरोधात असलेल्या रागाचे रुपांतरण गुन्हेगारीत झाले. गुन्हेगारीकडे वळलेल्या शेतक-यांच्या पाच मुलांची गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. यामधील सर्वच कलाकार नवीन आणि रंगभूमीवर काम करणारे असल्याचे प्रविण तरडे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. एवढेच नाही प्रविण तरडे देखील यामध्ये एका गुन्हेगाराची भूमिका साकारणार असल्याचा त्यांनी सांगितलं. यामध्ये प्रेक्षकांना त्यांचे सिक्स पॅक अ‍ॅब देखील पाहायला मिळतील. 

Web Title: Mulshi.com complies with the farmers' condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.