मुक्ता पण होणार वायझेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:51 IST2016-07-05T12:21:48+5:302016-07-05T17:51:48+5:30
आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आता सर्वांना ...
.jpg)
मुक्ता पण होणार वायझेड
आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आता सर्वांना वायझेड करायला सज्ज झाली आहे. आता तुम्ही म्हणाला वायझेड करणार म्हणजे काय तर तर मुक्ता आपल्याला वायझेड या चित्रपटात सई ताम्हणकर सोबत झळकताना दिसणार आहे. वायझेड हा सिनेमा सध्या त्याच्या आगळ््या-वेगळ््या नावाने चर्चेत असतानाच यामध्ये एक नवीन कॅरेकटर इन्ट्रोड्युस करण्यात आले आहे अन ते म्हणजे मुक्ताचे. पर्णरेखा, बत्तीस, गजानन, अंतरा अशी या सर्वांचीच नावे आहेत. पण मुक्ताचे नाव अजुन तरी जाहीर केलेले नाही. या चित्रपटाबद्दल सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता म्हणाली, डबलसीट नंतर मी अन समीर, क्षितीज ही आमची टिम दोन वषार्नंतर पुन्हा एकत्र काम करीत आहेत. सई तर माझी मैत्रिणच असल्याने शुटिंग करताना फार मजा आली. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा रिकनेक्ट झालो. आता मुक्ता यामध्ये नक्की कोणती अन कशाप्रकारची भुमिका साकारीत आहे हे आपल्याला लवकरच समजेल.