मुग्धा- प्रथमेशचे सूर जुळले, तू कधी लग्न करतेयस?; आर्या आंबेकर स्पष्टच बोलली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:07 IST2023-06-17T11:07:18+5:302023-06-17T11:07:40+5:30

Aarya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

Mugdha- Prathamesh tunes match, when are you getting married?; Aarya Ambekar clearly spoke... | मुग्धा- प्रथमेशचे सूर जुळले, तू कधी लग्न करतेयस?; आर्या आंबेकर स्पष्टच बोलली...

मुग्धा- प्रथमेशचे सूर जुळले, तू कधी लग्न करतेयस?; आर्या आंबेकर स्पष्टच बोलली...

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील पंचरत्न म्हणजे आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. या पंचरत्नांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नुकतेच या पंचरत्नांपैकी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली केली आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर(Aarya Ambekar)च्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील पंचरत्नांपैकी प्रथमेश आणि मुग्धा यांनी नात्याबद्दल नुकतीच कबुली दिली. त्यांच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे कार्तिकीने लिटिल चॅम्प्सनंतर काही वर्षातच लग्न केले. तर रोहित राऊतनेही गायिका जुईली सोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे आता चाहत्यांना आर्या आंबेकर कधी लग्न करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र आता आर्या आंबेकरने लग्नावर मौन सोडले आहे.

या सगळ्या अफवा आहेत...

एका मुलाखतीत आर्या आंबेकरने सांगितले की, 'मी यावर्षी खरेच लग्न करत नाही. या सगळ्या अफवा आहेत. माझ्या लग्नाच्या बातम्या सतत येण्यामागे जबाबदार आहे ती कार्तिकी गायकवाड. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकी गायकवाड हिने सगळ्यात आधी लग्न केले. त्यामुळे सगळे माझ्या मागे लग्नासाठी लागले आहेत. त्यातूनच माझ्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. सध्या तरी माझा लग्नाचा अजिबातच विचार नाही.' 

वर्कफ्रंटबद्दल...

आर्या आंबेकर हिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीतून सुरुवात केली.

Web Title: Mugdha- Prathamesh tunes match, when are you getting married?; Aarya Ambekar clearly spoke...