मृण्मयी देशपांडेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 16:13 IST2019-12-10T15:56:06+5:302019-12-10T16:13:55+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

Mrunmayee Deshpande share her photo on instagram | मृण्मयी देशपांडेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात!

मृण्मयी देशपांडेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात!

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

या फोटोतील तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे. मॉर्डन ड्रेसमध्ये मृण्मयीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या ग्लॅमरस फोटोसह मृण्मयी विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 


 याशिवाय कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

Web Title: Mrunmayee Deshpande share her photo on instagram